बोधी सामाजिक सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2024

बोधी सामाजिक सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड

 

प्रभाकर कांबळे

मुंबई / प्रतिनिधी 

          बोधी सामाजिक सेवा मंडळ मुंबई या सामाजिक संस्थेची कार्यकारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी विशेष कार्यकारी अधिकारी व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे तर सचिवपदी सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव तर खजिनदार पदावर गौतम नामदेव हरकुळकर यांची एक मताने निवड करण्यात आली. संचालक पदी अंकुश बाबू राजपुरे, गणेश दीपक शिंगरे, नंदिनी राजेंद्र जाधव व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष वनिता प्रभाकर कांबळे यांची निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment