बेळगाव भागातील मराठ्यांच्या प्रगतीसाठी मराठा सेवा संघाची धडपड, ७ जुलै रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2024

बेळगाव भागातील मराठ्यांच्या प्रगतीसाठी मराठा सेवा संघाची धडपड, ७ जुलै रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 


बेळगाव : सी एल वृत्तसेवा

      मागील महिन्यात कोल्हापूर येथील प्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर शिवश्री विनोद कुराडे यांचे बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन बेळगाव व येळ्ळूर येथे  आयोजित करण्यात आले होते. त्याला मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांच्या आग्रहास्तव विनोद कुराडे यांचे विद्यार्थी व पालक यांना पुन्हा एकदा मार्गदर्शन मिळण्याची सुवर्णसंधी 'मराठा सेवा संघ' बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

     यात मुले ऐकत नाहीत, चिरखोड स्वभाव, उलट बोलणे, सारखे टि.व्ही पाहणे, हुशार आहे पण आभ्यास करत नाहीत आदी समस्यांचे निवारण तसेच स्मरणशक्ती, एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढवावा, परिक्षेत भरघोस यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, क्रिएटिव्ह व्हिजुयलायझेशन द्वारे हवे ते यश कसे मिळवायचे याची माहिती व मार्गदर्शन होणार आहे.

    मराठा सभागृह, गणेश कॉलनी- संभाजीनगर, वडगाव- बेळगाव येथे रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत होणाऱ्या या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ इयत्ता नववी पासून पुढील विद्यार्थी व पालकांनी घ्यावा. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन निर्धारित वेळेत संपणार असल्याने सर्वांनी वेळेचे बंधन पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment