छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगावची आयुषा फडके शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ११ वी - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2024

छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगावची आयुषा फडके शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ११ वी

शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करताना मान्यवर.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात शासनाकडून  घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री छ शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज माणगाव (ता. चंदगड) ची विद्यार्थिनी कु आयुषा सटूप्पा फडके हिने 300 पैकी २६८ गुण मिळवून राज्यात ११ वा जिल्ह्यात ७ वा तर चंदगड तालूक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच मंथन परीक्षेत कु स्मिताली अशोक बेनके हिने 300 पैकी २६४ गुण मिळवत राज्यात १३ वा क्रमांक मिळवला. या विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक के बी नाईक व पी वाय पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या विद्यार्थिनीना मुख्याध्यापक के. बी. नाईक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment