चंदगड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, घटप्रभा नदीचे पाणी गवसे पुलावर...! गुडवळे- हेरे, सावर्डे- नांदवडे, करंजगाव- हलकर्णी या मार्गांवर पाणी, बाहतुक बंद - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2024

चंदगड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, घटप्रभा नदीचे पाणी गवसे पुलावर...! गुडवळे- हेरे, सावर्डे- नांदवडे, करंजगाव- हलकर्णी या मार्गांवर पाणी, बाहतुक बंद

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         गेल्या दोन-तीन दिवसात चंदगड तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी ओढ्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून तसेच वीज निर्मिती केंद्रातून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह नदी पात्रात वाढला आहे. 

       परिणामी आज दि. ४/७/२०२४ रोजी सकाळ पूर्वी नदीवरील गवसे येथील बंधाऱ्यावर २ फुट पाणी आल्याने चंदगड, हिंडगाव, इब्राहिमपूर, चितळे मार्गे आजरा या राजमार्ग २०१ वरील वाहतूक ठप्प झाली असून ती कुरणी, गवसे, इब्राहिमपूर, अडकूर प्रजिमा ६६ या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याशिवाय गुडवळे- हेरे, सावर्डे- नांदवडे, करंजगाव- हलकर्णी या मार्गांवरील ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. या मार्गांवरील वाहतूकही पर्यायी मार्गाने सुरू आहे. नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, धोका पत्करून पाण्यातून प्रवास करू नये. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment