मराठा आरक्षण प्रगनक मानधन प्रश्नी समन्वय समितीची तहसीलदार यांच्याशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2024

मराठा आरक्षण प्रगनक मानधन प्रश्नी समन्वय समितीची तहसीलदार यांच्याशी चर्चा

 

नायब तहसिलदार यांना निवेदन देताना समन्वय समितीचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

    सहा महिन्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार गावोगावी जात निहाय सर्वेक्षण करण्यात आले होते.  तहसीलदार कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या विविध शासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीच्या वेळेव्यतिरिक्त जादा वेळ देऊन हे जोखमीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करून दिले होते. तथापि संबंधित कर्मचाऱ्यांचे मानधन सहा महिन्यानंतरही आदा करण्यात आलेले नाही. 

      अनेक वेळा मागणी करून थकलेल्या चंदगड तालुका कर्मचारी समन्वय समितीने तहसीलदार राजेश चव्हाण, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत व विभाग प्रमुख करवाळ मॅडम यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. 

       यावेळी मानधन खात्यावर वर्ग करण्यासाठी सर्व कारवाई पूर्ण झाली असून ज्यांच्या मोबाईलवरून ॲपला माहिती पुरवण्यात आली त्या मोबाईलचा नंबर दिसत आहे. एकूण ४१२ प्रगणकांपैकी काही प्रगणकांनी दुसऱ्यांच्या मोबाईल वरून माहिती भरलेली असल्यामुळे प्रत्यक्ष त्यांना बोलवून घेऊन व सुपरवायझर यांच्याकडून खात्री करूनच त्यांना कुटुंब संख्येप्रमाणे मानधन अदा करण्यासाठी सूचना करण्यात येणार आहेत. याबाबत दोन दिवसात पुन्हा बैठक घेऊन यातील अडथळे बाजूला  करून त्याच दिवशी तात्काळ सर्वांचे मानधन खात्यावर वर्ग करण्यात येईल. असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाचे अध्यक्ष शिवाजी पाटील थोरात गटाचे अध्यक्ष सदानंद पाटील शिक्षक समिती अध्यक्ष धनाजी पाटील यांच्यासह चंदगड तालुक्यातील सर्व संघटना समन्वय प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment