चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ. ५ वी आणि इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संजय गांधी विद्यालय नागनवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे चंदगड तालुक्यात आपला दबदबा कायम राखून उज्वल यश संपादन केले आहे.
चंदगड तालुक्यातील इ. ८ वी एकूण शिष्यवृत्तीधारक ग्रामीण ३१ विद्यार्थ्यापैकी संजय गांधी विद्यालयाचे १६ विद्यार्थी तसेच, इ. ५ वी एकूण शिष्यवृत्तीधारक १२ विद्यार्थ्यापैकी १ विद्यार्थी असे एकूण विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले व चंदगड तालुक्यात प्रथम येण्याचा मान विद्यालयाने कायम राखला.
गुणांनुक्रमे विद्यालयाचे यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
इ. ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी (तालुक्यातील ३१ पैकी १६)
1.कु.अपूर्वा मोहन भोगुलकर (तालूक्यान 2 री)
2.कु.तन्मयी भरमू केसरकर (तालुक्यात 3 री)
3.शुभम मानसींग पाटील (तालुक्यात 4 था)
4.कु.सुकन्या परशराम आवडण (तालुक्यात 5 वी)
5.कु.शर्वरी तुकाराम पवार (तालुक्यात 6 वी)
6.श्रीनाथ शंकर भोगण (तालुक्यात 7 वा)
7.कु.पूर्वा महेश पवार
8.कु.सायली संजय ठाकरे
9.समर्थ महेश पाटील
10.कु.मयुरी सुनिल गावडे
11.वेदांत वैजू गोरल
12.कु.समिक्षा रामबंद्र पाटील
13.कु.समृद्धी संतोष सावंत-भोसले
14.कु.प्रणाली प्रकाश बोकमूरकर
15.कु.ऋतुजा रघूनाथ नाईक
16.कु. ज्योत्स्ना जयवंत कांबळे
इ. ५ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी (तालुक्यातील एकूण १२ पैकी १)
शिवराज देसाई (तालुक्यात ३ रा)
या सर्व विद्यार्थ्यांना शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक तसेच संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
No comments:
Post a Comment