चंदगड तालुक्यात पावसाची संततधार सुरुच, झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो,नऊ बंधारे पाण्याखाली - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2024

चंदगड तालुक्यात पावसाची संततधार सुरुच, झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो,नऊ बंधारे पाण्याखाली

  

मुसळधार पावसाने ताम्रपर्णीनदीवरील झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड तालुक्यात  सुरू असलेल्यां मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील झांबरे मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला.त्यामुळे ताम्रपर्णी नदीवरील उमगाव, न्हावेली कोकरे,आसगाव, कुरतनवाडी, हल्लारवाडी तर घटप्रभा नदीवरील पिळणी,भोगोली,हिडगांव असे नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.झांबरे परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल मध्य रात्री दोन वाजता ताम्रपर्णी नदीवरील  झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे जांबरे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचा धोका निर्माण होणार आहे.त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थानी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
मध्यम प्रकल्प - घटप्रभा (१००%), जांबरे (१००%) व जंगमहट्टी (७०%) 

झांबरे मध्यम प्रकल्पाची 
 दि ७/७/२०२४ ची स्थिती
*पूर्ण संचय पातळी – ७३७ मी.
*एकूण पाणीसाठा - २३.२३       
 द.ल.घ.मी (८२०.२५१ द.ल.घ.फू )
*आजची पाणी पातळी –७३७.००मी.( +०.४०)
 *आजचा एकूण पाणीसाठा  २३.२३ द.ल.घ.मी (८२०.२५१ द.ल.घ.फू )
टक्केवारी : १००%
*मागील २४ तासातील पाऊस=  १६६ मि.मी.
*१जून २०२४पासून एकूण पाऊस = १५३३ मी.मी.
*सांडवा  विसर्ग - १२५६.९५ क्युसेक्स
*विद्युतगृह विसर्ग- २३० क्युसेक्स 
*सिंचन विमोचक विसर्ग- ०० क्युसेक्स
*आवर्तन : बंद

No comments:

Post a Comment