चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
राज्यात कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक प्रति हेक्टर ९८२ किलो इतके काजू उत्पादन होते. तथापि काजू पिकाला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.
काजू उत्पादन शेतकऱ्यांना उचित भाव न मिळाल्यामुळे त्यांना प्रति किलो काजू वर अनुदान मिळावे अशी मागणी गोकुळ दूध संघाचे तज्ञ संचालक डॉ चेतन नरके यांनी शासनाकडे करून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळाने पणन विभागाला निर्देश देऊन राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो काजू बी साठी रुपये १० याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत प्रति शेतकरी शासन अनुदान देण्यासाठी एकूण अंदाजे रुपये २७९ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या ५ जुलै २०२४ रोजीच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून या निर्णयामुळे कोकणातील सुमारे २ लाख ३९ हजार काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment