चंदगड : सी एल वृत्तसेवा
लकीकट्टे (ता. चंदगड) येथे विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्यामुळे बाबू तानाजी मुंगारे या शेतकऱ्यांच्या चार दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवार दि ३०/०७/२०२४ रोजी दुपारी लकीकट्टे पाझर तलावानजीक घडली.
यामुळे मुंगारे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावरील या प्रसंगामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. म्हैशीं सोबत गेलेली तानाजी यांची पत्नी सुधा दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून बचावली. दरम्यान या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना योग्य ते शासन करून दुर्दैवी शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment