विरदेव मंदिर कालकुंद्री येथे पार पडलेल्या संयुक्त बैठकीत यात्रा रद्दचा निर्णय घेतल्यानंतर उपस्थित यात्रा कमिटी, सात पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
परिसरातील भाविकांची श्रद्धा असलेले कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जागृत देवस्थान श्री वीरदेव ची वार्षिक यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. बिरदेव मंदिर येथे गावातील हक्कदार सात पाटील, ग्रामपंचायत कमिटी पदाधिकारी, पोलीस पाटील, विरदेव यात्रा कमिटी व हक्कदार कांबळे समाज यांच्या ३१ जुलै रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी यावर्षीची यात्रा पूर्णपणे बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरत होती. यात्रा काळात गावातील माहेर वाशीणी मुली व त्यांचे कुटुंबीय देवदर्शन साठी आवर्जून मंदिरला भेट देत होते. तथापि यावर्षी यात्रा रद्द झाल्याने ग्रामस्थ, पाहूणे, भाविक, बकरी- कोंबड्या विक्रेते व सर्व प्रकारचे व्यापारी यांनी निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीवेळी उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मुतकेकर, सात पाटील प्रतिनिधी पुंडलिक पाटील, विष्णू पाटील, लक्ष्मण पाटील, पोलीस पाटील संगीता कोळी, शिवाजी जाधव, पुंडलिक कांबळे, दत्तात्रय कांबळे, तुकाराम कांबळे, संजय कांबळे, यमाजी कांबळे, कल्लाप्पा कांबळे आदींसह वीरदेव मंदिर यात्रा कमिटीचे सदस्य व कांबळे समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment