चंदगड / प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हजगोळी ता.चंदगड येथे चाळोबा देवालय परिसरात वृक्षारोपण करणेत आले. यावेळी नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली . विनायक महादेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यंकटेश कनगुटकर ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील,शिवसेना चंदगड तालूका अध्यक्ष अवधूत भुजबळ उपतालुका प्रमुख श्री पेडणेकर विभागप्रमुख, संजय पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र देणेत आली.
हजगोळी शाखाप्रमुख जोतिबा कलखांबकर यांची निवड करण्यात आली. यावेळी ढेकोळी, सरोळी, सुरूते आदी ठिकाणी शाखाप्रमुखांची नियुक्ती करणेत आली.
No comments:
Post a Comment