इब्राहिमपूर केंद्राचे समन्वयक गजानन बैनवाड यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील व इतर मान्यवर |
चंदगड /सी एल वृत्तसेवा
विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून चंदगड तालुका शिष्यवृत्तीत अग्रस्थानी आणावा असे विचार चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय प्रथमिक शाळा इब्राहिमपूर (ता चंदगड) येथे इब्राहिमपूर केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील बोलत होते .
ते पुढे बोलताना म्हणाले, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शैक्षणिक कामात प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असेल. शिक्षकांनी प्रशासकीय कामात कमी वेळ देवून अधिक वेळ वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दिल्यास गुणवंत विद्यार्थी निश्चित घडतील.
यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून केंद्राचे केंद्रसमन्वयक गजानन बैनवाड, बापूसाहेब मुरगी, सौ. सुजाता पाटील यानी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. केंद्रात नवीन दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षिकांचा तसेच केंद्राचा पदभार मिळाल्याबद्दल गजानन बैनवाड यांचा गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आल. या परिषदेला मुख्याध्यापक सहदेव गावडे, भरमू गावडे, नामदेव माईनकर आदी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रसमन्वयक गजानन बैनवाड यानी केले. सूत्रसंचालन विजय
ढोणूक्षे यानी तर प्रवीण साळूंखे यानी आभार मानले.
No comments:
Post a Comment