शैलेश सुतार ओमकार सदावर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
येत्या सप्टेंबर महिन्यात चंदगड येथील रामदेव गल्लीच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश सुतार तर उपाध्यक्षपदी ओमकार सदावर यांची निवड करण्यात आली.
चंदगड येथील श्री रामदेव कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अंतर्गत साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी नवी कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली. मंडळाची वार्षिक सभा जेष्ठ सदस्य संजय चंदगडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंडळामार्फत सालाबाद प्रमाणे होणारा गणेशोत्सव तसेच वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष- शैलेश सुतार, उपाध्यक्ष- ओमकार सदावर, सेक्रेटरी- महेश सुतार, खजिनदार- सुशांत कुलकर्णी तर सदस्य म्हणून अभिजीत देसाई, संदीप कोकरेकर, राहुल चौगुले, विलास सुतार, सौरभ पाटील, सिद्धार्थ पेडणेकर, यश चौगुले, अक्षय पंडित, राजू सुतार, प्रथमेश गडकरी, विनायक हवालदार आदींची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. सागर हवालदार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment