हलकर्णी महाविद्यालयात एन. एस. एस. विभागातर्फे वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2024

हलकर्णी महाविद्यालयात एन. एस. एस. विभागातर्फे वृक्षारोपणचंदगड / प्रतिनिधी

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागातर्फे महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक व राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, एन. एस. एस. विभाग प्रमुख प्रा. उमाजी पाटील, प्रा. शाहू गावडे, प्रा. आर. व्ही. पाडवी, प्रा. अंकुश नौकुडकर इ. मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, पेरू, कडूलिंब, चिंच व शोभिवंत झाडे लावण्यात आली. यावेळी एन. एस. एस. विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. शाहू गावडे यांनी केले. तर आभार प्रा. आर. व्ही. पाडवी यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment