तेऊरवाडी येथे धूमाकूळ घालणारा हाच तो माडांचा कळप
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गव्यांच्या त्रासाने अगोदरच वैतगलेल्या तेऊरवाडी(ता. चंदगड) ग्रामस्थांना वानरांच्या कळपाने हैरान करून सोडले आहे. मोर, हत्ती, गव्या पाठोपाठ आता वानरांनीही प्रचंड नासधूस चालू केल्याने तेऊरवाडीकर प्रचंड वैतागले असून ग्रामपंचायतीने व वनविभागाने या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गव्यांच्या त्रासाने अगोदरच वैतगलेल्या तेऊरवाडी (ता. चंदगड) ग्रामस्थांना वानरांच्या कळपाने हैरान करून सोडले आहे. मोर, हत्ती, गव्या पाठोपाठ आता वानरांनीही प्रचंड नासधूस चालू केल्याने तेऊरवाडीकर प्रचंड वैतागले असून ग्रामपंचायतीने व वनविभागाने या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तेऊरवाडी गाव कर्नाटक महाराष्ट्र सिमेला लागू वसले आहे. बेळगाव, हुक्केरी, गडहिंग्लज व चंदगड अशा चार तालूक्यांच्या सिमारेषा या गावाला लाभल्या आहेत. या गावच्या उत्तरेला जंगल लाभले आहे. वन विभागा बरोबरच तेऊरवाडीचे गायरान क्षेत्रपण आहे. जंगलाच्या पलिकडून घटप्रभा नदी वाहते. या जंगलात मे मध्ये महिनाभर हत्ती तळ ठोकून होता. गव्यांच्या कळपानी तर तेऊरवाडी करांच्या डोळ्यांची झोपच उडवली आहे.
गव्यांच्या त्रासाला वैतगलेल्या शेतकऱ्यांनी हजारो एकर जमिन पड पाडली आहे. यातच भर म्हणून आता ३५ हून अधिक माकडांच्या कळपाने चक्क तेऊरवाडी गावातच धूमाकूळ घालायला सुरवात केली आहे. माकडानी घरावरच उड्या मारायला चालू केल्याने घरांची कौले उध्वस्थ होत आहेत. ऐन पावसाळ्यात कौले फोडली जात असल्याने ती परत दुरुस्त करायचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबर गावातील असणाऱ्या नारळाच्या झाडावरील कोवळे नारळ, पेरू, शेवगा आदि फळे नष्ट केली जात आहेत. या माकडांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर ती माकडे कळपाने अंगावर चाल करून येत आहेत. गावातील लहान मुले व महिलामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्या पूर्वी ग्रामपंचायत व वन विभागाने संयुक्त मोहिम राबवत या वानरांना जंगलात हाकलून देण्याची मागणी तेऊरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment