दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिंद्रा बोलेरो पिकप गाडी नंबर KA-22-B-1829 मध्ये तीन गाई व एक वासरू भरून कत्तलीसाठी नेणाऱ्या चंदगड तालुक्यातील दोघांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल 27 ऑगस्ट 2024 रोजी रात्री साडेनऊ वाजता तळकट गावानजीक घडली. संशयित आरोपींवर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम दोडामार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 84/24 महा. पशु संरक्षण अधिनियम कलम 5(A),5 (B),9, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1)(d), 11(1)(e), 11(1)(f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर गुंडू नाईक (वय 24) व अजय तुकाराम नाईक (वय 24) वर्षे दोघेही राहणार हेरे (ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. वरील प्रमाणे तीन गायी व एक वासरू गाडीत भरून निर्दयपणे त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी वाहतूक करत असताना आढळले. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल समीर सुतार यांनी दोडामार्ग पोलिसात दिली असून याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल गवस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment