बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करताना चंदगड बार असोसिएशनचे पदाधिकारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा
बेळगाव - वेंगुर्ले राज्य मार्गाची यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी करूनही इकडे जाणीव पूर्वक कानाडोळा केला जात आहे. याच्या निषेधार्थ चंदगड तालुका वकील बार असोसिएशनच्या वतीने गुडेवाडी फाटा (ता चंदगड) जवळ पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांत वृक्षारोपण करत आंदोलन केले.
बार असोसिएशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष मळवीकर यांनी आपल्या वकील सहकाऱ्यांसह सामाजिक बांधिलकीतून हे वृक्षारोपण आंदोलन केले. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यात पंधराशे कोटींची विकास कामे सुरू असल्याचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेते सांगत आहेत. मग त्यात बेळगाव वेंगुर्ला रस्त्यासाठी काही निधी आहे की नाही? असा सवाल करत या रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोल्हापूर विभागीय अभियंता तसेच चंदगड येथील उपअभियंता यांना वेळोवेळी सूचना देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. असा आरोप करत येत्या आठ दिवसात रस्त्यातील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने न बुजवल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही. असा इशारा यावेळी दिला. यावेळी बारचे अध्यक्ष ॲड संतोष मळवीकर यांच्या सह ॲड व्ही आर पाटील, ॲड के एस सुरतकर, ॲड एस एस पाटील, ॲड खाचू नाकाडी, ॲड बाळासाहेब कागणकर, अनिल गावडे, नागेश भोगुलकर आदींची उपस्थिती होती.
29 August 2024
Home
chandgad
वकिलांनी केले बेळगाव- वेंगुर्ले रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण
No comments:
Post a Comment