पूराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या चार म्हशींचा मृत्यू....! उमगाव येथील दुर्घटना - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2024

पूराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या चार म्हशींचा मृत्यू....! उमगाव येथील दुर्घटना

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   चंदगड तालुक्यातील उमगाव नजीकच्या सावतवाडी येथील रहिवासी हिरगा रामा गावडे या शेतकऱ्याच्या चार म्हशी पूराच्या पाण्यातून वाहून गेल्या. या चारही म्हशी ताम्रपर्णी नदीवरील माळी गावानाजीच्या बंधाऱ्यात मृतावस्थेत अडकल्याची आढळल्या.

   गावडे हे आपल्या म्हशी तीन दिवसांपूर्वी चारण्यासाठी रानात घेऊन गेले होते. चरता चरता म्हैशी त्यांच्या नजरेपासून दूर गेल्या. त्या सापडल्या नाहीत त्यामुळे म्हशी चरत जंगलात गेल्या असाव्यात या अंदाजाने त्यांनी दोन दिवस जंगलात शोध घेतला. तथापि दिवसानंतर चारही म्हशी ताम्रपर्णी नदीवरील माळी बंधाऱ्यात मृतावस्थेत अडकलेल्या आढळल्या. सध्या चंदगड नजीक हेरे मार्गावरील बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे हेरेकडे जाणारी सर्व वाहने चंदगड, झांबरे- उमराव मार्गावरून याच बंधाऱ्यावरून हेरे तिलारीनगर कडे जात आहेत.

  म्हशी चरत असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जवळच्या ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली. ओढ्याकाठी चरणाऱ्या म्हशी वाहून गेल्या असाव्यात असा अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेत हिरगा गावडे यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने या गरीब कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उमगाव व सावतवाडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहें.


No comments:

Post a Comment