तिलारी घाटात अवजड वाहतूक रोखण्यासाठी उभारलेल्या कमानीला अवजड वाहनाचीच धडक - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2024

तिलारी घाटात अवजड वाहतूक रोखण्यासाठी उभारलेल्या कमानीला अवजड वाहनाचीच धडक

तिलारी घाटाच्या माथ्यावर उभारण्यात आलेल्या कमानीला अवजड वाहनं धारकांना धडक दिली. कमान वाकली खांब वाकला 

चंदगड / प्रतिनिधी
     तिलारी घाटातून अवजड वाहने रोखण्यासाठी अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर उपविभाग चंदगड बांधकाम यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून घाटाच्या माथ्यावर पायथ्याशी तीन मीटर कमान उभारण्यात आली होती. साईडचे खांब अगोदर उभे केले होते तर मधला भाग गुरुवारी सायंकाळी वेल्डिंग करून जोडण्यात आला होता. राञी धुक्यात दहा फुटापेक्षा उंच वाहन धारकांला कमानीचा अंदाज आला नसल्याने कमानीला धडक दिली. यामुळे एका बाजूला लोखंडी खांब वाकला तर मधला भाग खाली आला आहे. या नंतर धडक देणारे वाहन माघारी फिरले घाटातून खाली आले असते तर खालची कमान तुटली असती. 

     तिलारी घाटातून अवजड वाहने रोखण्यासाठी अखेर बांधकाम विभाग यांनी कमान उभारली आहे. पहिल्या दिवशी वाहनाने धडक दिली आहे. घाटमाथ्यावर कमान आहे. येथे दाट धुके असते यामुळे कमान आहे. या ठिकाणी गतिरोधक दोन्ही बाजूंनी घालावे जेणेकरून वेग कमी होईल शिवाय कमान मधून दहा फुटापेक्षा उंच वाहन जाणार नाही असे सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.तिलारी घाटात अवजड वाहने रोखण्यासाठी उभी केलेल्या कमानीला अवजड वाहन धडकले हे बांधकाम विभाग चंदगड याना समजले आहे या ठिकाणी दुरुस्ती करायला हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी वन जंगल घाट सेक्शन आहे. तेव्हा येथे चंदगड पोलिसांनी कमानी जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment