चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदार संघातील तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील गावकर्यांसोबत अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर मानसिंग खोराटे यांनी घेतलेल्या राजकीय विचारांसोबत राहण्याचे निर्णय घेतला. सर्वांनी ठरवले की विधानसभा निवडणुकीसाठी मानसिंग खोराटे यांना पाठींबा द्यायचा.
कारण चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी वाहतूकदार यांची दयनीय अवस्था झाली होती. अथर्वचे मानसिंग खराटे यांनी दौलत कारखाना 39 वर्षासाठी चालवण्यास घेऊन तालुक्याला तसेच दौलत परिवाराला गत वैभव प्राप्त करून दिले. या बैठकीत गावकर्यांनी आपली मतदारसंघाच्या सर्वांगीण शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून चर्चाद्वारे विचारांची देवाणघेवाण केली.
या वेळी एकनाथ गणपती पाटील माजी सरपंच तेऊरवाडी, नामदेव गावडू पाटील, राजाराम सुबराव पाटील, भरमु मारुती पाटील, परशराम भरमू डांगे, भरमु भैरु दड्डीकर, महेश मारुती मगदुम, तानाजी कृष्णा कुंभार, राजेंद्र धोंडीबा पाटील, जोतिबा दुधाप्पा दड्डीकर, एकनाथ जानबा पाटील, नामदेव मारुती सुतार व पी. डी. सरवदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment