पालक सभेला मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख गजानन बैनवाड व शेजारी उपस्थित पालक
चंदगड / सी एल वृत्तसेवा
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी व शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतच आहेत. पण यासोबतच जर पालकांनीही शाळेला सहकार्य केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन इब्राहिमपूर केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन बैनवाड यानी व्यक्त केले. ते भावेश्वरी विद्या मंदिर बुझवडे (ता चंदगड) येथे आयोजित पालक मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दळवी होते.
यावेळी बैनवाड यानी पालकांशी सवांद साधून विद्यार्थी व शाळेच्या विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगतिले. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. नवीन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून महादेव कांबळे तर उपाध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुख्याध्यापक उत्तम पाटील यानी पालकांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सचिन दळवी यानी केले. सूत्रसंचालन पी एल कुंभार यानी तर आभार तुकाराम घोळवे यानी मानले.
No comments:
Post a Comment