चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील खेळाडूंचे शाहू साखर कारखान्या मार्फत घेण्यात येणाऱ्या मानधन धारक कुस्ती स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल खेळाडूंचा चेअरमन अथर्व -दौलत कारखाना मानसिंग खोराटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील मुलानी शारीरिक मेहनतीच्या खेळामध्ये भाग घ्यावा. मांडेदुर्ग ह्या गावाला कुस्तीचा वारसा आहे. या गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन कुस्तीपटू तयार झालेले असून त्यांच्या यशा पाठोपाठ इतरांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या गावचा नावलौकिक वाढवावा. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मांडेदुर्ग यासाठी दौलत अथर्व प्रशासनाकडून पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यश संपादन केलेले खेळाडू खालील प्रमाणे......
1.पैलवान सत्यजित संकपाळ (ज्युनिअर ६० किलो कांस्य पदक)
2. पैलवान श्रेयश कपले (ओपन गट कांस्य पदक)
3. पैलवान शंभुराजे कपले (32 किलो सहभाग)
4. पैलवान सुजय राजेंद्र नौकुडकर (पाच किलोमीटर रनिंग कांस्य पदक)
यावेळी या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तानाजी भरमान पाटील, सुरेश नागोजी पाटील, प्रमोद कृष्णा दोरुगडे, तानाजी एकनाथ चोपडे, निंगाप्पा मारुती पाटील, एकनाथ गणपती पाटील (माजी सरपंच तेऊरवाडी) बापूसाहेब शिरगावकर (कोरज) आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अश्रू लाड यांनी मानले.
No comments:
Post a Comment