तिलारी घाटातून अवजड वाहने रोखण्यासाठी बांधकाम विभाग यांनी घाटाच्या पायथ्याशी उभारलेली कमान शुक्रवारी रात्री कर्नाटक येथील ट्रकने उडवली. |
चंदगड / प्रतिनिधी
तिलारी घाटातुन वाढत्या अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तिलारी घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी तीन मीटर उंच कमान उभारली होती. यातील एक कमान तीन दिवसांपूर्वी एका वाहनाने धडक देऊन तोडली आहे.त्यामुळे या कमानीचे तीन तुकडे झाले. यामुळे दहा फूट उंच वाहनांना मार्ग मोकळा झाला. यामुळे पायथ्याशी उभारलेली कमान अडचण ठरत आहे.शुक्रवारी रात्री माल वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील एका ट्रकने ही कमान उडवली.यामुळे अवजड वाहनांना मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा बांधकाम विभागाने फक्त लहान चार चाकी वाहन सुटेल अशा पद्धतीने रस्त्यावर कमानीचे दगडी बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.
दोडामार्ग - चंदगड दरम्यान हा धोकादायक तिलारी घाट आहे. गोवा येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून बेळगाव, कोल्हापूर, पुणे, इतर राज्यातील वाहने घाटातून ये जा करतात.या घाटातून चाळीस टन मालाची वाहतूक करणे शक्य नाही असे असताना अवजड वाहने ये जा करू लागल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व चंदगड पोलिसांनी तिलारी घाटातून अवजड वाहने कायमस्वरूपी बंद करावी असा प्रस्ताव सादर केला होता. कोल्हापूर
जिल्हाधिकारी यांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली. आणि तातडीने घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी अवजड वाहने जाऊ नये यासाठी कमान उभारावी असे कळविले. या नुसार कमान उभारण्यात आली. पण तीन दिवसांपूर्वी घाट माथ्यावरची कमान उडवली,ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री कर्नाटकातील एका ट्रकने पायथ्याशी उभारलेली कमान उडवली. यामुळे अवजड वाहनाांची वहातूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव येथील अनेक मालवाहतूक करणारी वाहने या तिलारी घाटातून ये जा करतात. आता गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे यामुळे माल भरून जवळच्या मार्गाने दोडामार्ग गोवा येथे जाता यावे यासाठी माल वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांचे कमान तोडण्याचे षडयंत्र आहे.
तेव्हा येत्या दहा बारा दिवसांत मोठ्या प्रमाणात सामान भरलेली अवजड वाहने ही तिलारी घाटातून ये जा करणार आहे. तेव्हा या वाहनांना प्रवेश भंदी करण्यासाठी घाटाच्या माथ्यावर व पायथ्याशी वेडेवाकडे तिढवे दगडी बांधकाम करावे यातून चार चाकी वाहन सुटेल असे बांधकाम करावे जेणेकरून अवजड वाहनांना चाप बसेल.चंदगड येथील
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी.या घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये जा करतात तेव्हा कर्नाटक येथील वाहने जे मालवाहतूक करतात अशा वाहनांना चाप बसायला हवा अशी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.या कमानीच्या जवळच
विजघर येथे दोडामार्ग पोलीस ठाण्याअतंर्गत पोलीस चौकी आहे.त्यामुळे अवजड वाहनांची वहातूक बंद केली असताना व कमान उभारलेली आहे,हे माहीत असताना हा ट्रक गेलाच कसा हा प्रश्न पडला आहे.
No comments:
Post a Comment