मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देताना विष्णू जोशीलकर, सुबराव पवार आदी सदस्य
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी ही रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कोल्हापूर स्थित चंदगड तालुका मित्र मंडळाच्या वतीने नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुळातच दुर्गम व डोंगराळ असलेल्या चंदगड तालुक्यात शैक्षणिक सोयी सुविधांची वाणवा आहे. त्यातच गेली अनेक वर्षे येथे अधिकारी व शिक्षकांची संख्या पूरेशी नाही. सध्या तालुक्यात १९७ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याबाबत मित्र मंडळाच्या वतीने कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या निदर्शनास ही बाब आणले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या जागा तात्काळ भरण्याच्या सूचना केल्या आहेत. खा. शाहू महाराज यांनी केलेली सूचना व मित्र मंडळाचे निवेदन यांचा आदर करून चंदगड तालुक्यातील किमान ९७ पदे लागलीच भरण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी चंदगड तालुका कोल्हापूर मित्र मंडळाचे अध्यक्ष वस्ताद व महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर, सचिव डॉ. गोपाळ गावडे, संघटक सुबराव पवार, उपाध्यक्ष एम. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment