अण्णाभाऊ साठे व बॅ. खर्डेकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2024

अण्णाभाऊ साठे व बॅ. खर्डेकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वाटप

  


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा 

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, जागर फाउंडेशन व बाळासाहेब खर्डेकर- निंबाळकर फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने कोल्हापूर येथे रक्तदान शिबिर व जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.

    या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिरात सुमारे १०० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला तथापि रक्त चाचणी नंतर प्रत्यक्षात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नुकतेच सेवानिवृत्त झालेले जिल्हा परिषदेचे कनिष्ठ लेखाधिकारी सुबराव रामचंद्र पवार (मुळ गाव - होसूर, ता. चंदगड) यांच्या सेवानिवृत्ती  कार्यक्रमा वेळी पुष्पगुच्छ अन्य खर्चाला फाटा देऊन गरजू मुलांसाठी शालेय साहित्य स्वीकारले होते. त्या जमलेल्या साहित्य वाटपासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील डोंगराळ भागातील प्रत्येकी एका शाळेची तसेच कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल अशा १३ शाळांची निवड केली होती. त्या शाळांतील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी कार्तिकेयन यांच्यासह मनीषा शिंदे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, डॉ.संजय रणवीर, सौ अरुणा हसबे, प्रा.बी.जी. मांगले, विक्रमसिंह खर्डेकर, सुबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुषमा पाटील यांनी केले. नितीन देशमुख यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment