कोसळणारा उभा पाऊस,पाणी साचून झालेला गुडघाभर चिखल, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानीचे पंचनामे - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2024

कोसळणारा उभा पाऊस,पाणी साचून झालेला गुडघाभर चिखल, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानीचे पंचनामे

 

कोवाड (ता. चंदगड) येथील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना अधिकारी  व शेतकरी

कोवाड ता.७ / सी एल वृत्तसेवा

       अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषि  विभाग,ग्राम विकास विभाग आणि महसूल विभाग यांचे अधिकारी तालुक्यातील कोवाड येथील पिक नुकसानीचे पंचनामे गुडघाभर चिखलातून वाट काढत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

    चंदगड चे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शेत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. तहसीलदार तसेच तालुका कृषि अधिकारी विज्यकुमार ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि पर्यवेक्षक सतीश कुंभार, संतोष खुटवड कृषि सहाय्यक गोपाळ गव्हाळे, किरण पाटील, सुधाकर मुळे, अतुल मुळे, तेजस वांद्रे, पूजा जाधव, अतिश चव्हाण ,तेजस्विनी भिंगुडे,तलाठी प्रशांत पाटील,ग्रामविकास अधिकारी सोनार सह महसूल सहाय्यक राजू वांद्रे ,ग्रामपंचायत क्लार्क विष्णू जोशी आदी चिखल व शेतवडीत साचलेल्या पाण्याची तमा न बाळगता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून  नुकसानीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी हे सर्व अधिकारी मोठ्या तळमळीने  पंचनामे करत आहेत. यावेळी जोतिबा भोगण,नदीम मुल्ला अनिल गावडे, नागेश धर्मोजी, राजू मुल्ला आदि शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment