पीएसआय छाया बंबरगेकर व तिच्या आई-वडिलांची उघड्या जीपमधून ग्रामस्थांनी गावभर मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या कु छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर संपूर्ण गावभर जल्लोषी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. आई- वडील अशिक्षित असतानाही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने P. S. I. पदाला गवसणी घातल्याने गावातील ग्रामस्थांसाठी ही एक अपूर्व घटना ठरली आहे. गावच्या या उत्साह व जल्लोषात तालुक्यातील आमदारांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिचा सत्कार करताना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे सोबत माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील आप्पी पाटील आदी. |
यावेळी मनोगत व्यक्त करताना पीएसआय छाया बंबरगेकरने आपल्या कुदनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत घेतलेले शिक्षण, राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील पदवी अभ्यासक्रम तसेच गुरुकुल अकॅडमी पुणे येथील मार्गदर्शनाचा उल्लेख केला. आपले आई-वडील शेतात मोलमजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्याला शिकवत आहेत. याची जाणीव ठेवून दहावी परीक्षेत कालकुंद्री केंद्रात प्रथम आल्यानंतर पीएसआय होण्याचा निर्धार केला होता. ध्येय समोर ठेवून अभ्यासात सातत्य राखले. कोरोना काळात गावाकडे शेतातील झाडाखाली बसून अभ्यास केला. गावातील इतर मुला मुलींनी स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे, त्यासाठी गावात स्पर्धा परीक्षा चळवळ सुरू व्हावी अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे राजू रेडेकर, पुंडलिक कोकितकर, पोलीस पाटील नामदेव लोहार, विजया कोकितकर, मायाप्पा पाटील, शंकर आंबेवाडकर, राजीव गांधी पतसंस्था चेअरमन पी बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नागरदळेकर, मारुती बंबरगेकर, प्रकाश कसलकर, विजय आंबेवाडकर, तुकाराम ओऊळकर, डॉक्टर राहुल पवार, योगेश बिर्जे, अनिल मोहनगेकर, सागर हेब्बाळकर, मधुकर आंबेवाडकर, शंकर कोरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दस्तगीर उस्ताद यांनी केले, सतीश निर्मळकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment