महागाव / सी. एल. वृत्तसेवा
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण पंधरा विद्यार्थी सन २०२३-२४ गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यामध्ये मेकॅनिकल विभागातील कु. कुणाल सावंत (दूसरा), कु. संकेत कोकितकर (चौथा), कु. ओंकार पाटील (नववा), इलेक्ट्रीकल विभागातील कु. विनायक पाटील (तिसरा) कु. केदार कुंभार (पाचवा), कु. सलमान मुल्लाणी (सहावा), कु. शामल पाटील (आठवी), सिव्हील विभागातील कु. रूचा रावण (सातवी) तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील कु अनुजा जाधव (दूसरी), कु सृष्टी कुलकर्णी (सहावी), कु संपत्ता गुळणाव्वर (आठवी) तसेच कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, विभागातील कु. पोर्णिमा कल्लसन्नावर (चौथी), कु अर्चना मगदूम (सातवी), कु. अश्विनी मुतकेकर (आठवी), व कु. श्रेया खबाले (नववी) यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संजय सावंत म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून संत गजानन अभियांत्रीकीचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावत आहेत. मागील वर्षी 2022-23 मध्ये एकूण 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले होते. महाविदयालयातील सुधारित शिक्षण पद्धत, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, औद्योगिक क्षेत्रांना भेटी व गुणवत्तापूर्ण शिक्षण या सर्वाचा उपयोग विद्यार्थी जडण-घडणीवर होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. (ॲड.)अण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, सेक्रेटरी, ॲड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार, शिरीष गणाचारी व प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment