महिलांना आर्थिक साक्षर करून आत्मनिर्भर बनवणार - मानसिंग खोराटे, छत्रपती शासन महिला आघाडीच्या महिलांचा विधानसभेसाठी पाठींबा जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2024

महिलांना आर्थिक साक्षर करून आत्मनिर्भर बनवणार - मानसिंग खोराटे, छत्रपती शासन महिला आघाडीच्या महिलांचा विधानसभेसाठी पाठींबा जाहीर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महिला सक्षम असेल तरच कुटुंब व्यवस्थित उभं राहतं. त्यासाठी घरच्यांबरोबर समाजातील लोकांची साथ गरजेची असते. महिलाभगिनी अडचणीत असल्याचा फायदा घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांनी त्यांना फसवल, त्या कर्जाच्या कचाट्यात अडकल्या आहेत. त्यामुळे माता भगिनींना आर्थिक साक्षर करून सक्षम करण्याचं माझं ध्येय आहे. मतदारसंघात महिलांसाठी कुटीर उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलण्याची संधी मला द्या असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना स्थळावर महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

     ते पुढे म्हणाले, ``महिलांची मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून आर्थिक फसवणूक झाली. त्यांना कर्जाच्या खाईत ढकलण्यात आले. त्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देण्यात आला. त्यावेळी चंदगड मतदार संघातील कुणीही छत्रपती शासन महिला आघाडीला मदत केली नाही. कोरोनाकाळात त्यांच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही. केवळ राजकारणासाठी महिलांचा वापर केला जातो. किमान आतातरी या महिलांना न्याय मिळावा, त्यांना एक खंबीर आधार मिळवा यासाठी आगामी विधानसभेत खोराटे यांना पाठिंबा देत असल्याचे महिला आघाडीच्या अनिता नाईक यांनी सांगितले. यावेळी समन्वयक विनोद नाईक यांनी या महिलांच्या अडचणी, न्यायालयीन लढाई याची परिस्थिती मांडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

    कर्ज काढलं असलं तरी कुणीही दादागिरी करू शकत नाही. तुमच्या पाठीशी आपण खाबिर आहोत. त्यांना जशास तसे उत्तर द्यायला समर्थ असून महिलाभगिनींच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही खोराटे यांनी दिली. 

      हलकर्णी : छत्रपती शासन महिला आघाडीच्या महिलांनी मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी आघाडीच्या अनिता नाईक, शितल कांबळे, रोहिणी गणाचारी, लता सुतार, मंगल आके, रोहिणी मेणसे, समन्वयक विनोद नाईक व इतर महिला,

       व्यवसाय आणून स्थानिक तरुण आणि महिलांना रोजगार देण्याचं आपलं व्हिजन आहे. महिलांना जर पाठबळ मिळालं तर त्या कुठेच कमी पडणार नाहीत. त्यामुळे या महिलांच्या हाताला काम देण्याला प्राधान्य असून त्यासाठी तुमचे आशीर्वाद, पाठबळ द्या असे आवाहन खोराटे यांनी यावेळी केलं.

     जगन्नाथ हुलजी म्हणाले की, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून या महिलांना अडचणीत आणले. आज खोराटे हे सर्वांचे अशास्थान असून तुम्ही योग्य व्यक्तीकडे आला आहात. आजपर्यंत इथल्या नेते मंडळींनी गरिबाला गरीब ठेवण्याचं काम केलं आहे. त्यांनी केवळ बक्कळ पैसे कमावला, पण न्यायालयीन खटल्यात सहकार्य महिला मायक्रो फायनान्सच्या कर्जात सापडल्या आहेत. त्यांना शक्य तितकी मदत करू. कंपनीकडून झालेली फसवणूक, त्यातून होणारी फरफट थाबवण्यासाठी हे कर्ज कशा पद्धतीने फेडता येईल, त्याचबरोबर कंपनीविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यात चांगले वकील देऊन त्यांना सहकार्य करू, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही मानसिंग खोराटे यांनी यावेळी दिली.

       इथल्या शेतकरी, कामगार, महिलांचा कधी विचार केला नाही. आपल्या मतदारसंघ हा अस्मानी संकटाने घेरलेला असून या सुलतानी संकटाला झेलत जीवन जगत आहोत. त्यातून जर चांगले दिवस यायचे असतील तर त्यासाठी सक्षम नेतृत्व आणि पाठबळ हवं आहे. त्यासाठी खोराटे यांना पाठबळ देऊन त्याच्या मध्यांतून पुढे जाऊया असे आवाहन जगन्नाथ हुलजी यांनी केले.

      यावेळी महिला अघाडीच्या अनिता नाईक, शितल कांबळे, रोहिणी गणाचारी, लता सुतार, मंगल आके, समन्वयक विनोद नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्राचे सुत्रसंचालन नारायण पाटील तर आभार विनोद नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment