अतिवृष्टीमुळे कामेवाडी येथे घर कोसळून नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2024

अतिवृष्टीमुळे कामेवाडी येथे घर कोसळून नुकसान


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कामेवाडी तालुका चंदगड येथे घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
    गेला महिनाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी कामेवाडी येथील बसवानी सिद्राम शिरगे यांचे शेतातील राहते घर कोसळले.
     यात घराचे पूर्ण नुकसान झाले असून घरातील शेती अवजारे व साहित्याचे नुकसान झाले. शिल्लक राहिलेल्या भिंतीना पूर्ण भेगा पडल्यामुळे सर्व घर काढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

No comments:

Post a Comment