चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील दिवंगत शिक्षक वसंत वैजनाथ एटले यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (दि. 30/7/2024) त्यांच्या पत्नी वासंती एटले, सासरे मायाणा पाटील (किणी) व कन्या वृषाली देवण (करेकुंडी) यांच्या पुढाकाराने कडलगे बुद्रुक येथील मराठी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरणारे इयत्ता पहिली ते सातवी सर्व वर्ग व विषयाचे होम रिवाईज या नामांकित कंपनीचे 35000₹ किमतीचे ई - लर्निग मटेरीयल भेट म्हणून दिले. या उपक्रमाचे चंदगडच्या शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच परशराम पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुनील संभाजी पाटील, सुनील महादेव पाटील व पालक विलास परशराम पाटील, नवनाथ विष्णू कांबळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी आदर्श शिक्षक कै. वसंत एटले गुरुजी यांच्या जीवनाचा परिचय त्यांच्याशी असलेले संबंध तसेच त्यांची सामाजिक बांधिलकी आणि आयुष्यात दान करण्याच्या वृत्तीचे महत्त्व सांगतानाच अनेक उदाहरणे व दाखले देऊन विद्यार्थ्यांना उपकृत केले, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत कडलगे बुद्रुक च्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांचे आभार ही मानले.
सूत्रसंचालन व आभार अध्यापक अनिल बागिलगेकर यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक रघुनाथ पाटील यांनी केले. अध्यापिका लता बिर्जे-पाटील, सुजाता सडाके, शोभा कुंभार उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment