चंदगड / प्रतिनिधी
"महसूल विभाग हा सर्व विभागांचा कणा असुन या विभागामार्फत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. आपत्ती व्यवस्थापन ,पूर परिस्थिती नियंत्रण, दुष्काळ व तक्रार निवारण करण्यासाठी २४ तास हा विभाग कार्यरत असतो. आपले प्रशासन सुशासन झाले आहे. लोकांच्या सेवेतून समाधान मिळते. समाजसेवा करण्याची संधी आपणास मिळते हे भाग्य. नेहमी ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. यातून समाधान प्राप्त होईल. ध्येयपूर्तीमुळे आत्मविश्वास सकारात्मकता वाढते व समाजात मानाने जगता येते. महाविद्यालयीन जीवनातच ध्येय ठरवा कष्ट करा मेहनत घ्या व स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करा. समाजासाठी आपले उत्तर दायित्व आहे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. आई वडील गुरूंचे स्थान आयुष्यात मोठे आहे. चिकाटी कष्ट सातत्य यश प्राप्तीसाठी महत्त्वाचे आहे. चिकाटी चंदगडच्या मातीचा गुणधर्म आहे "असे प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. ते हलकर्णी ता चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात तहसीलदार कार्यालय चंदगड व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'महसूल पंधरवडा -२०२४ 'निमित्त 'युवा संवाद 'या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर, उपप्रचार्य प्रा आर बी गावडे, मंडल अधिकारी अरुण शेट्टी, तलाठी इक्बाल तांबोळी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमा मागचा हेतू उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे यांनी आपला प्रस्ताविकातून स्पष्ट केला. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार राजेश चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष संजय पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात संजय पाटील यानी आपल्या तालुक्याचे कुटुंबं प्रमुख तहसीलदार असतात . त्यांना अनेक कार्य पार पाडावी लागतात .योग्य न्याय देण्याचं काम हे तहसील विभाग करत असतो. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.'
यावेळी या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, प्रा. डॉ. आय. आर. जरळी, डॉ. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. यु. एस. पाटील, प्रा. ए. एस. बागवान, डॉ. ए. बी. पिटूक, डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा ए एस जाधव,प्रा एस बी कांबळे,प्रा जी जे गावडे,प्रा सी एम तेली,प्रा जे एम उत्तरे,प्रा एस वाय आरबळी,डॉ जयश्री पाटील,प्रा एन के जावीर सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नंदकुमार पाटील यांनी केले तर आभार प्रा एन एम कुचेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment