उमगाव - सावतवाडी येथे गावडे कुटुंबीयांना रोख रक्कम देताना गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर व मान्यवर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चार दिवसांपूर्वी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदी पुरात चार म्हशी वाहून गेल्या होत्या. त्यानंतर माळी येथील बंधाऱ्यात मृतावस्थेत अडकलेल्या आढळल्या. उमगाव पैकी सावतवाडी येथील हिरगा रामा गावडे हे आपल्या म्हशी चारण्यास घेऊन गेले होते. नदीला अचानक आलेल्या पुराने पुरामुळे काठावर करणाऱ्या चारही म्हशी वाहून गेल्या होत्या. यात त्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा शासकीय स्तरावरून झाला असला तरी या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून गोकुळच्या संचालिका अंजना केदारी रेडेकर यांनी २० हजारांची रोख मदत दिली. रेडेकर यांनी आपद्ग्रस्त दूध उत्पादक शेतकरी हिरगा गावडे यांना गोकुळ तर्फे शक्य तितकी मदत मिळवून देऊ असा दिलासा दिला. यावेळी भावेश्वरी महिला दूध संस्था उमगावचे चेअरमन गंगाराम रेडकर, अब्दुल सत्तार शहा, महादेव गुरव, महादेव धुरी, चंद्रकांत गावडे, श्रीकांत बांदेकर, आकाश गावडे, विनायक कुंभार, सचिन देशपांडे, सचिन देसाई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment