सोनाली भूलकर |
अडकुर / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच.त्याला जीवनभर कष्ट करावे लागते. या कष्टाची जाणीव ठेऊन उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे ही खरंच अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. हे सोनालीने सिद्ध करून दाखवले आहे. ती गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली आहे.
सोनाली ही चंदगड तालुक्यातील मुगळी येथे राहणारी लेक तिला लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड. वडील कै. संदिप नुलकर यांनी आपल्या स्वतःच्या जाग्यात माध्यमिक हायस्कूल उभा केले होते. त्या हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सोनालीच्या लहानपणातच वडिलांचे छत्र हरवले मात्र आई शांता हिने काबाडकष्ट करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण राजर्षि छत्रपति शाहू महाराज सरकारी मेडिकल कॉलेज व छत्रपति प्रमिलाताई राजे रूग्णालय कोल्हापुर सौ.स.म.लोहिया कॉलेज कोल्हापुर 11 व 12 विज्ञान शाखा येथे आपले शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील कै. संदिप नुलकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. तर आई मोलमजूरी करते. ग्रामीण मातीतील आईच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न तिने बघितले. त्यासाठी तिने कोल्हापूर गाठले. कोल्हापूर शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव यामुळे जिद्दीने सलग चार ते पाच वर्षे अभ्यास केला.यामुळेच तिच्या मेहनतीला फळ आले. सोनाली गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली.पंचक्रोशीतून कौतुक होत असून मुगळी गावचे नाव महाराष्ट्रात उज्ज्वल केले.
No comments:
Post a Comment