कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड, ग्रामपंचायत कोवाड व माहेर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात मुतखडा, मुत्र रोगावरील शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार, हाडांचे फ्रॅक्चर, दमा, न्युमोनिया, अतिदक्षता विभागातील उपचार, स्त्री रोग उपचार व शस्त्रक्रिया व ईसीजी मोफत केले जाणार आहेत. याशिवाय शिबिरात सहभागी रुग्णांसाठी अति संवेदनशील प्रसूती, गर्भाशयाची लॅप्रोस्कोपिक व ओपन सर्जरी, वंध्यत्व निवारण, कलर ड्रॉपलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, सी आर्म व व्हेंटिलेटर या सुविधा दिल्या जाणार आहेत. कोवाड प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश चिवटे, बालरोग तज्ञ डॉक्टर राजेश पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ बी बी गॉडद, डॉ बी एफ गॉडद, हृदयरोग तज्ञ डॉ धीरज नाईक, डॉ प्रज्ञा सप्ताळे उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ अनिता भोगण व उपसरपंच रामचंद्र व्हन्याळकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे. परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment