पाणीच पाणी सगळीकडे, तरीही कोवाडकर तहानलेले, नदीकाठावरील पंपिग स्टेशन मध्ये बिघाड, एक दिवसाआड पाण्याच्या टँकरचा पुरवठा - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2024

पाणीच पाणी सगळीकडे, तरीही कोवाडकर तहानलेले, नदीकाठावरील पंपिग स्टेशन मध्ये बिघाड, एक दिवसाआड पाण्याच्या टँकरचा पुरवठा

पाणी उपसा करणारी मोटर गेल्या वीस दिवसांपासून  पुराच्या पाण्यात, टँकर ने पाणी पुरविण्याची ग्रामपंचायत वर येते आहे वेळ

गावाला होत असलेली पाणी पुरवठा व्यवस्था पुराच्या पाण्याने वेढली आहे.

कोवाड / सी एल वृत्तसेवा

     कोवाड (ता. चंदगड) मधील पुराचे पाणी संथगतीने कमी होत असून सध्यस्थितीत गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याचे पंपिंग स्टेशन मधील मोटर गेल्या वीस दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत पाण्यात अडकली असल्याने पुराच्या पाण्याने हैराण झालेले कोवाडकर मात्र तहानलेलेच असल्याचे चित्र आहे.

      पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याकारणाने येथील ग्रामपंचायतीवर एक दिवसाआड टँकर ने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे तो देखील अपुरा पडत आहे.कायम भेडसावत असलेल्या महपुराच्या संकटामुळे स्थानिक प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण अपेक्षित होत.परंतु या ठिकाणी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याने गावातील लोकांचे मात्र पाण्याविना हाल होत आहेत.

     गावाचे वैभव असणाऱ्या ताम्रपर्णी नदीकाठावरील अतिक्रमणे,नदीतील गाळ काढणे असे अनेक प्रश्न ऐरणीवर असतानाच आता कोवाडकराना पाण्यासाठी टेरेस वर जमा झालेले पाणी देशी जुगाड करून बॉटल लावून पाईप च्या साहाय्याने जमा करून वापरण्याची वेळ आली आहे.

    जुन्या पाणी पुरवठा व्यवस्था व्यतिरिक्त सन २०२२-२३ मध्ये २८-०९-२०२१ रोजी जलजिवन मिशन अंतर्गत नळ  पाणी पुरवठा योजना सुधारणा करणे कामी १ कोटी  ७४ लाख रुपयांच्या तांत्रिक निधीला मान्यता मिळाली असून ग्रामस्थ व  ठेकेदार यांच्यामध्ये काही प्रश्नावरून वाद होऊन सदर योजना रखडल्याने ही योजना देखील अधांतरीच असल्याचे चित्र आहे.

     त्यामुळे कोवाडकरांसाठी इतकी पाणी व्यवस्था असतानादेखील असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.तरी महापुराची टांगती तलवार डोक्यावर असताना नव्याने येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्ना मुळे ग्रामस्थ हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे.

     गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या प्रकल्पापैकी जलशुध्दीकरण प्रकल्पाला पाणी नेणारी व्यवस्था गेले वीस दिवस महापुराच्या पाण्यात असून सदर मोटर नादुरुस्त झालेले पाणी पुरवठा बंद अवस्थेत आहे.गावातील काही भागात पाणी पुरवठा केला जात असून गावाच्या रणजित नगर व श्री राम नगर येथील भागात पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे.याच ठिकाणी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आसून पंप (मोटर) असलेल्या नदी ठिकाणी महापुराच्या  पाण्याने वेढा घातला असून सद्यस्थितीत अजून एक ते दीड फूट पाणी ओसरल्याशिवाय नादुरुस्त असलेली मोटर बाहेर काढणे अशक्य आहे.अश्या परिस्थितीत जल शुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यात जिकिरीचे झाले आहे. सद्यस्थितीत संथ गतीने पाणी कमी होत असल्याने वेळ जात असून लवकरात लवकर पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यात येईल - दिपक वांद्रे, (सदस्य ग्रामपंचायत कोवाड)

No comments:

Post a Comment