कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील अनेक गावात भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातही अनेक गावात धाडसी चोऱ्या झाल्या आहेत. मात्र आता ताम्रपर्णी नदीवरील बंधाऱ्यावर संरक्षक कठड्याचे पाईपही चोरून नेल्याचा प्रकार माणगाव येथे घडला आहे.
माणगाव ते माणगाव फाटा या दरम्यान ताम्रपर्णी नदीवर बंधारा आहे. या बंधार्यावर पाटबंधारे खात्यातर्फे लोखंडी कॉलम उभे करून आडव्या पाईप घालण्यात आल्या होत्या. मात्र चार दिवसापूर्वी पुलावरील पुराचे पाणी कमी झाले होते, यादरम्यानच पंधरा ते वीस पाईप चोरून नेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. यानंतर पुन्हा पाटबंधारे खात्याने सदर संरक्षक कठड्याला पुन्हा आडव्या पाईप बसवल्या होत्या. आता पुन्हा या पाईपची चोरी झाल्याने पोलिसांनी या चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
No comments:
Post a Comment