बदलापूर घटनेचा निषेध करताना कोवाड येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली..
गेल्या दोन वर्षात महिला व लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्राचे गृहखाते निद्रिस्त झाले आहे. यांना महाराष्ट्रातील जनतेचे, आया बहिणींचे काही देणे घेणे नाही असे हे सरकार असून अशा नराधामावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घ्यायला घाबरत आहे का? त्याचमुळे असे नराधम पावलोपावली असे गैर कृत्य करत आहेत त्या मुलीवर अत्याचार होऊन जवळजवळ 13 ते 15 तास उलटून गेले तरीही त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे चंदगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थित उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, उपतालुका प्रमुख विनोद पाटील, महिला आघाडी व उपतालुकाप्रमुख सौ गुलाबी शिंदे शाखाप्रमुख सौ लक्ष्मी पाटील, विभाग प्रमुख उत्तम सुरुतकर, शिवाजी पाटील, शाखाप्रमुख मारुती कांबळे, मारुती पाटील, अशोक पाटील, गटप्रमुख शंकर पाटील,अशोक भिंगुर्डे, प्रमोद पाटील, एकनाथ पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment