सौ. अरुणा निलेश तरवाळ |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
दुंडगे (ता. चंदगड) येथील सौ. अरुणा निलेश तरवाळ ह्या विद्यापीठ अनुदान आयोग तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) गणित विषयांमधूनउ त्तीर्ण झाल्या. त्या सध्या राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे कनिष्ठ विभागामध्ये अध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांचे बी.एस्सी.चे शिक्षण रामकृष्ण परमहंस कॉलेज, उस्मानाबाद तर एम. एस्सी.चे शिक्षण हे न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, अहमदनगर इथून झाले. तसेच त्यांनी बी. एड. कॉलेज ऑफ एज्युकेशन, उस्मानाबाद येथून पूर्ण केले.
त्यांना राजाराम कॉलेज येथील गणित विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मोरये, प्रा. अर्चना पाटील, प्रा. डॉ. एल. डी. जाधव, प्राचार्या डॉ. अनिता बोडके तसेच पती प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ, प्रा. डॉ. गजानन राशीनकर, प्रा. किशोर क्षीरसागर, प्रा. भामरे, प्रा. देशमाने, प्रा. जाधव, प्रा. फुलसागर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर कुमारी अनुप्रिया, आई, वडील, सासू, सासरे यांचे प्रोत्साहन मिळाले.
त्यांचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सरिता ठकार मॅडम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे, प्रा.डॉ. आर. जी. सोनकावडे, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. व्हटकर यांनी कौतुक केले.
तसेच शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment