गांजा विक्री करणारा कागणीतील एकजण पोलिसांच्या ताब्यात - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2024

गांजा विक्री करणारा कागणीतील एकजण पोलिसांच्या ताब्यात

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
      कागणी- कालकुंद्री मार्गावर गांजा विक्री करणाऱ्या कागणी येथील एकावर कोवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद खुशाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल यांनी चंदगड पोलीस ठाणे येथे दिली असून संशयित आरोपीला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
       याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कागणी- कालकुंद्री रस्त्यावरील आपल्या राहत्या घराशेजारील शेडमध्ये संशयित आरोपी आनंद बंडू देसाई (वय वर्ष २१,  रा. कागणी, ता. चंदगड) हा स्वतःच्या फायद्या करिता सुमारे २५० ग्रॅम वजनाचा तपकिरी रंगाचा, क्वचित ओलसर सुकलेला गांजा हा अमली पदार्थ बाजारभावानुसार अंदाजे किंमत रुपये ५ हजार, विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन हिरो मोटरसायकल सह वावरताना पोलिसांना आढळला. मोटरसायकल व गांजा  अशा एकूण ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह त्याला ताब्यात घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर हणमंत नाईक हे करत आहेत.

No comments:

Post a Comment