कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी संस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कुदनूर येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत रामचंद्र बामणे होते. प्रास्ताविक मानद सचिव मौला जमादार यांनी केले. संस्थेचे व्यवस्थापक बाळकृष्ण नागरदळेकर यांनी अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. चालू वर्ष हे संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सभासदांना १३% लाभांश व भेटवस्तू देणे बाबत ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत बी के पाटील, रामचंद्र मल्हारी, सिद्धू मांडेकर, मष्णू पाटील, रामचंद्र बामणे, बाबाजान कालकुंद्रीकर आदींनी सहभाग घेतला. सिद्राम गुंडकल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment