चंदगड / प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर मध्ये रेल्वे सुरू केल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी जिल्ह्याच्या दक्षिण विभागात रेल्वे सुरू करणेसाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही, कोणतीही इंडस्ट्री या भागात आली नाही त्यामुळे येथील युवक अधीक बेरोजगार झाला.येथील युवक मुंबई पुण्याकडे जाऊन मिळेल ती नोकरी करू लागला,त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूर ते चंदगड रेल्वे सुरू झाल्यास येथील शेतकरी वर्गाला योग्य मार्केट मिळेल,बेरोजगारी कमी होईल,भागाचा विकास होईल यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवाशी संघातर्फे गडहिंग्लज येथे काल निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले.प्रवाशी संघाचे अध्यक्ष ऍड चंद्रकांत निकम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली,यावेळी चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच व पोलीस पाटील संघटना चे पदाधिकारी,शेतकरी वर्ग उपस्थित होते.
यावेळी ऍड चंद्रकांत निकम यांनी प्रास्ताविका मध्ये कोल्हापूर ते चंदगड रेल्वे सुरू करणे,बेळगाव ते सावंतवाडी रेल्वे सुरू करणे ,कोल्हापूर ला वंदे भारत रेल्वे सुरू करणे,सणानिमित्त जादा बोगी लावणे आदी विषयावर आपली भूमिका मांडली व ही चळवळ गावागावात पोहोचली पाहिजे तसेच गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यातून जवळपास ५ लाख पोस्ट कार्ड रेल्वे च्या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठवण्याचा संकल्प जाहीर केला.उपस्थितानी उस्फुर्त पाठिंबा जाहीर केला व येणाऱ्या काळात ही चळवळ गावागावात घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना संघाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश दळवी यांनी कोल्हापूर ते चंदगड रेल्वे हे सर्वांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.शिवराज शिक्षण संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी या स्तुत्य उपक्रमास जाहीर पाठिंबा दिला आणि आम्ही या आंदोलनात नेहमी आपल्या सोबत राहू असे जाहीर केले. बाबासाहेब आजरी,ॲड.एम.ये. पाटील,गडहिंग्लज पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी,चंदगड चे अध्यक्ष अमृत देसाई आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment