मलतवाडी येथील नागरिकांकडून चंदगड विधानसभेचे उमेदवार मानसिंग खोराटे यांना पाठिंबा - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2024

मलतवाडी येथील नागरिकांकडून चंदगड विधानसभेचे उमेदवार मानसिंग खोराटे यांना पाठिंबा

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड विधानसभा मतदार संघातील मलतवाडी येथील गावांमधील नागरिकांनी अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर मानसिंग खोराटे यांच्यासोबत भेट घेतली. चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी वाहतूकदार यांची झालेली दयनीय अवस्था पाहता मानसिंग खोराटे यांनी दौलत कारखाना 39 वर्षासाठी चालवण्यास घेऊन तालुक्यातील सभासद शेतकरी व तोडणी वाहतूकदार तसेच दौलत परिवाराला गतवैभव प्राप्त करून दिले. चंदगड तालुक्याला विकासाचे वैभव लाभण्यासाठी मलतवाडी मधील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला.

      मानसिंग खोराटे म्हणाले, ``दौलतवर आज सुद्धा राजकारण चालू आहे.  त्यामुळे शासकीय कामांना अडचणी येत आहेत. म्हणून मी राजकारणात येण्याचा निश्चय केला. मी राजकारणातून समाजकारण करणार आहे. कारण मी या समाजाच काहीतरी देण लागतोय आपली मतदारसंघाच्या सर्वांगीण शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनाच्या चर्चाद्वारे सर्वांनी एकमताने ठरवले की, विधानसभा निवडणुकीसाठी मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठींबा दिला.``

       या वेळी शशिकांत रेडेकर, नागोजी पाटील, नारायण सुंडकर, नामदेव पताडे, संजय गणपती पाटील, परश्याम सातबारा सुंडकर, सुबराव रेडेकर, बाळू तरवार, तुकाराम रेडेकर, रजनीकांत पाटील, तातोबा रेडेकर, मायाप्पा पाटील, रामचंद्र पाटील, सुधाकर सखनकर, सुरेश सखनकर, प्रकाश सखनकर आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशु लाड यांनी केले. 

No comments:

Post a Comment