गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय किसान संघाने भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित केलेल्या बैठकीत मानसिंग खोराटे यांना आगामी निवडणुकीसाठी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत खोराटे यांनी गडहिंग्लज क्षेत्रात होणाऱ्या विकासाबाबत ठाम वचन दिले. यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले, ``दौलतमुळे चंदगड तालुक्याच्या विकासाची जशी गती आहे. तशीच हारळी कारखाना सुरु करून गडहिंग्लजच्या तालुक्याचा विकासाची गती देखील सुनिश्चित करू. मतदारसंघ हा एक कुटुंब आहे आणि त्याच्या विकासासाठी मला काहीतरी योगदान देणे आवश्यक आहे. समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे. बैठकीत उपस्थितांनी मानसिंग खोराटे यांचे वचनाचे स्वागत करत तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. असे भारतीय शेतकरी संघाच्या या समर्थनामुळे खोराटे यांना त्यांच्या विकासाच्या योजनांना गती देण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. या वेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष बाळगोंडा पाटील, तालुकाध्यक्ष गडहिंग्लज गुरुराज हत्ती, चंद्रशेखर मोळदी रामभाऊ पाटील, अमरनाथ घुगरी, काशिनाथ मूर्ती, मलगोंडा पाटील, शिवाजी पाटील व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment