चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील जागर जाणिवांचा व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
प्रास्ताविक जागर जाणिवांच्या प्रमुख, प्रा. डॉ. सौ. आर. ए. कमलाकर- सूर्यवंशी यांनी करून जागर जाणीवांचा विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनीनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. गोरल म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, अभ्यासाबरोबर आपल्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यायला हवे, सुदृढ शरीरातच सुदृढ मन असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी वेगवेगळ्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. के. एन. निकम यांनी आपले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रा. राहुल पाटील यांनी शरीरातील रक्ताचे महत्त्व, रक्ताचे घटक याबाबतची माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रा. मयुरी कांडर यांनी केले. तर आभार प्रा. सौ.एस. बी. दिवेकर यांनी मानले.
यावेळी डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. एन. पाटील, नंदकुमार चांदेकर, अरुण कांबळे, शिवराज हासुरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment