चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
इतर मागासवर्ग हा वंचित आहे. वंचित वर्गाने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना, मुक्त वसाहत योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व योजनांचा लाभ घेण्याच्या आवाहन मागास बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसी विमुक्त जाती जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी शासनाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना या विभागाच्या सहाय्यक संचालिका सौ. सुनीता नेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना योजनांची विविध माहिती अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत करून दिली दिली. विद्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती योजना, मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी ची योजना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचे प्रधान योजना, व्यावसायिक प्रशिक्षण योजना, निर्वाह भत्ता योजना, मेंढपाळ कुटुंबातील मेंढपाळासाठीची अनुदान योजना, इत्यादी योजनांची माहिती करून देऊन महापुरुषांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज असल्याचे या विभागाचे गृहपाल बी. एन.कांबळे यांनी सांगितले.
अध्यक्ष भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. गोरल यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ओबीसी महामंडळाचे निरीक्षक, प्रशांत सावंत, सुनील कुंभार, वसंतराव नाईक महामंडळाच्या निरीक्षक सौ.गीता साठे यांनीही शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. आभार डॉ. एन. एस. मासाळ यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ. के. एन. निकम, डॉ. आर. ए. कमलाकर- सूर्यवंशी, डॉ. शाहू गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, श्रीनिवास पाटील, विजय कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment