कोवाड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा रामा यादव, राजश्री सुर्वे उपाध्यक्षा - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2024

कोवाड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा रामा यादव, राजश्री सुर्वे उपाध्यक्षा

  

रामा यादव

राजश्री सुर्वे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड च्या नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रामा आप्पाजी यादव यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ राजश्री लक्ष्मण सुर्वे यांची निवड करण्यात आली. शाळेत नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यात ही निवड करण्यात आली. स्वागत मुख्याध्यापक सुरेश कल्लाप्पा पाटील यांनी केले. प्रास्ताविक अध्यापक गणपती लोहार यांनी केले.

     करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष रामा आप्पाजी यादव, उपाध्यक्ष सौ राजश्री लक्ष्मण सुर्वे, सदस्य जोतिबा तानाजी महागावकर, अभिजीत अरविंद कुंभार, नजीर इकबाल गणेशवाडी, सौ सविता संभाजी कांबळे, सौ वर्षा पांडुरंग चोपडे, सौ रुपाली आदित्य सुतार, ग्रामपंचायत प्रतिनिधी- दीपक रामू वांद्रे, शिक्षण तज्ञ- कल्मेश शंकर कांबळे, शिक्षक प्रतिनिधी- मधुमती गुंडू गावस, विद्यार्थी प्रतिनिधी- आदिती संभाजी आडाव व वेदांत सुधीर कांबळे, सचिव- सुरेश कल्लाप्पा पाटील आदींची निवड करण्यात आली. ही समिती सन २०२४-२५ व २५-२६ सालासाठी काम करणार आहे. पालक मेळाव्यास विनायक राजगोळकर, संतोष खुटवड, संभाजी आडाव, विष्णू जोशी, कृष्णा बिरजे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना सातेरी अतवाडकर, जयमाला जानबा पाटील, कविता विष्णू पाटील आदींनी परिश्रम घेतले. श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment