गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज शहरातील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात आहे. पथदिव्यांच्या लाईट बिलाच्या कारणावरून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे शहरातील जनजीवन बाधित होत आहे. रस्त्यावर अंधारामुळे होणारे अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जी नागरिकांसाठी अतिशय धोकादायक आहे. येणारा गणेश चतुर्थी सण हा मोठया प्रमाणात साजरा केला जातो. मेनरोड वरील पथ दिवे बंद असलेने श्री गणरायच्या आगमनाला व अनंत चतुर्थीला नागरिकांंना या अंधाराचा खूप मोठा त्रास होणार आहे.
याबाबत आज ४ सप्टेबर २०२४ रोजी बैठकीत सांगितलं कि शुक्रवारी बैठक लावू पण सर्व नागरिकांना पदाधिकारी यांना बैठकीचा निष्कर्ष समजून येत नाही. प्रशासनावर विश्वास राहिला नाही म्हणून ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडहिंग्लज येथील दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित हायवे अधिकारी व आपण रस्तारोको ठिकाणी येऊन आमची मागणी पूर्ण करावी. अन्यथा हे आंदोलन उग्र स्वरूपात निर्माण होईल याची सर्वस्वी जबादारी आपली राहील. होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल असाही इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर नागेश चौगुले, राजूदादा तारळे, सुनील शिंत्रे, सौं. स्वातीताई कोरी, राजेंद्र गड्ड्याणावर, अमर चव्हाण, विद्याधर गुरुबे, सिद्धार्थ बन्ने, संजय संकपाळ, संतोष चिक्कोडे, बसवराज आजरी, प्रीतम कापसे, प्रभात साबळे, केम्पपान कोरी यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment