कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
जननायक कर्पुरी ठाकूर राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र विभाग कायदेशीर सल्लागारपदी चंदगड येथील प्रल्हाद बळवंत शिरगावकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल संकपाळ व राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब बिडवे यांनी नुकतेच शिरगावकर यांना प्रदान केले.
मुळगाव कालकुंद्री (ता चंदगड) सध्या चंदगड येथे राहणारे प्रल्हाद शिरगावकर B.com,B.A.(DMMT) हे एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त सहाय्यक वाहतूक निरीक्षक आहेत. सेवेत असतानाच त्यांनी समाजकार्याची आवड जोपासली. गेली ४० वर्षे ते नाभिक समाजाचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे. नाभिक समाज सुधारणा मंडळ चंदगड या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे सांभाळली. राज्य परिवहन महामंडळाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या अनेक कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंदगड येथील पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यामुळे एसटी महामंडळात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
आपल्या मधुर वाणीने कायदेशीर बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याची हातोटी व अन्यायग्रस्तांना मिळवून दिलेला न्याय या कार्याची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सल्लागार अशा महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment