चंदगड आगारामध्ये २० सप्टेंबरला प्रवासी राजा दिनाचे आयोजन - आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2024

चंदगड आगारामध्ये २० सप्टेंबरला प्रवासी राजा दिनाचे आयोजन - आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांची माहिती

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड आगारामध्ये शुक्रवार दि. २०/०९/२०२४ रोजी प्रवासी राजा दिन सकाळी १०.०० ते दुपारी २.०० व कामगार पालक दिन दुपारी १५.०० ते १७.०० या वेळेत आयोजित करणेत आला आहे. या प्रवाशी राजा दिनासाठी  कोल्हापूरचे विभाग नियंत्रक हे उपस्थित राहणार आहेत. तरी प्रवासी राजा दिनामध्ये प्रवासी, प्रवासी संघटना व सर्व तक्रारदार यांच्या रा. प. महामंडळाशी निगडीत तक्रारी व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी याबाबतचे लेखी निवेदनाद्वारे स्वीकारून त्यासंबंधी तात्काळ निर्णय देण्यात येणार आहे.

      प्रवासी, संघटना व सर्व रा.प महामंडळाच्या निगडीत तक्रारदार, रा.प कर्मचारी यांनी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन या अनुषंगाने सदर दिवशी उपस्थित राहणेचे आवाहन चंदगड आगाराच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment